Tuesday 22 March 2016

Information : Bird Rescue & related Pakshimitra Contact details

Tips on Bird Rescue
  • जखमी पक्षी सापडला की पहिल्यांदा गर्दी बाजूला करून त्याला शक्यतो अंधारात एकटा ठेवणे.
  • शक्यतो उचलु नये पक्षी. कुठला आहे त्यावर ते अवलंबून आहे.
  • मोठा शिकारी पक्षी असेल तर उचलायला जाऊ नका, कारण त्याची नखे तुम्हाला लागू शकतात. 
  • आणी तो ही attack करू शकतो कारण त्याला कळत नाही की तुम्ही त्याला मदत करत आहात हे.
  • पण छोटा पक्षी असेल तर हलक्या हाताने उचलून अंधरात , खोलीत खिड़की जवळ ठेवावा.  नाहीतर त्याची शिकार होऊ शकते.
  • बरेच वेळा ते घाबरलेले असतात , ते थोड्या वेळाने आपो आप उडून जातात.
  • कृपा करून त्यांना अजिबात खायला, पेयला चोचित कोम्बू नका.
  • बरेच वेळा पाणी घालताना त्यांच्या श्वास नलिकेत पाणी जाते.
  • तुम्ही अजिबात ट्रीटमेंट देऊ नका, कात्रज ओर्फनेज ला फोन करा.


 जखमी पक्षी सापडला तर खालील नंबर वर फोन करावा.

दीपक सावंत : ९५९५३६६२४५ 
दीपक सावंत जखमी पक्षांवरील उपचारा संधर्भात कार्यशाळा घेतात।

अनुज खरे 
8007976337 

Pakshimitra Call centre for Injured birds
 9223050607

Katraj Orphange
2024370747

Saturday 5 March 2016

घन जीवामृत... By Neela Panchpor

सेंद्रिय शेती/ बागकाम करणाऱ्यांसाठी जीवामृत हे वरदानच आहे. झाडांसाठी ते उत्तम पारंपारिक सेंद्रिय खत समजले जाते. 
यामध्ये द्रव जीवामृत आणि घन जीवामृत असे दोन प्रकार आहेत.


या दोन्ही मधील महत्त्वाचा फरक म्हणजे टिकाऊपणा.
द्रव जीवामृत हे तयार केल्यापासून चवथ्या दिवशी वापरले तर त्याचा संर्वोत्तम फायदा होतो, त्यानंतर त्याचे गुणधर्म कमी होत जातात. या तुलनेने घनजीवामृत सहा महिन्यापर्यंत छान टिकते.

घनजीवामृत तयार करण्याची पद्धत खालील प्रमाणे :-
देशी गाईचे शेण       10 kgs.
देशी गाईचे गोमूत्र    500 ml.
डाळीचे पीठ           200 gms.
नैसर्गिक गूळ।         200 gms.
मूठभर माती

 हे सर्व एकत्र करून घ्यावे. त्याच्या गोवऱ्या नाहीतर ढीग करून सावलीत वाळवून पोत्यात भरून ठेवावे.
कुंडीत झाडांना घालताना अंदाजे मूठभर असे मातीच्या वरच्या थरात मिसळून घालावे. घालताना मातीत ओलावा असणे हितकारक आहे.
घनजीवामृत मधील पोषक द्रव्यांचा हवेशी सम्पर्क आला तर ते गुणधर्म कमी होऊ नयेत म्हणून घातल्यानन्तर त्यावर mulching करणे फायद्याचे ठरते.

Step 1

Step2


Step 3

Step 4



Article By
Neela Panchpor




जीवामृत....माहिती व कृती--: By Suchitra Diwan


बागेचे नंदनवन बनविणारे जीवामृत

आपली बाग नेहमीच फळाफुलांनी बहरलेली असावी असे कायमच आपल्याला वाटतअसते आणि त्यासाठी आपले बागेत सतत
नवनवे प्रयोग चालू असतात.आम्हालाही जीवामृतची माहिती मिळाल्यावर त्याचाआमच्या बागेत प्रयोग करून पाहिला आणि जीवामृत मुळे आमची बाग सतत फळलेली आणि फुललेली दिसू लागली.



जीवामृतची आमची कृती--:


१ किलो देशी गायीचे शेण(शेण ताजे असावे)
१ लिटर देशी गायीचे गोमूत्र (शिळे असले तरी चालते)
१०० grm सेंद्रिय गूळ (जुना गूळ उत्तम)
१०० grm कुठल्याही डाळीचे पिठ     
    १ मूठ बागेतली माती
   १० लिटर पाणी
वरील सर्व जिन्नस एकत्र करून चांगले ढवळावे.
व सावलीत झाकून ठेवावे.दररोज सकाळ 
संध्याकाळ clock wise ढवळावे.५ व्या
किंवा ११व्या दिवशी वापरावे.वापरताना ते
डायल्यूट करून वापरावे.१ लि जीवामृत+१० लि
पाणी असे डायल्यूट करून मोठ्या झाडांना
१ लि.व लहान झाडांना १ फुलपात्रे असे घालावे.
जीवामृत घालताना झाडांची माती ओली असावी
(जीवामृत घालण्यापूर्वी झाडांना पाणी घातलेले
असावे) दर २१ दिवसांनी रिपिट करावे.


जीवामृतच्या इतर काही कृती:
१ घळसासी कृती:
वरील मिश्रणात अंडी व दही
   पण घालतात.
२संदीप चव्हाण: १०लि जीवामृतधे ५० grmमध
                       व १००grm ताजे दही घालावे
                     असे सांगतात
३सुभाष पाळेकर:
घन जीवामृत: गाय व बैल यांचे शेण प्रत्येकी
अर्धा किलो
१०grm सेंद्रिय गूळ किंवा फळांचा रस
१० grm बेसन 
हे  सर्व एकत्र करून सावलीत ढिग लावणे,
४८ तासांनंतर उन्हात वाळवणे

जीवामृतसाठी देशी गायीचेच शेण का वापरावे
असा प्रश्न अनेकजण विचारतात.त्याची 
तज्ञांनी सांगीतलेली कारणे पुढील प्रमाणे

मा.श्री.खकेसरांनी त्यांच्या 'मातीचे स्वरूप व
सेंद्रिय खते'
या पुस्तकात देशी गायीच्या शेणाचे
महत्व  सांगताना पुढिल मुद्दे मांडले आहेत
१: गायीचे शेण उष्णता रोधकाचे काम करते
२: रशियन शास्त्रज्ञांचा निष्कर्ष : गायीच्या 
शेणामधे रेडिएशन शोषून घेण्याची शक्ती आहे
३: जर्मन शास्त्रज्ञांचा अहवाल: गायीच्या शेणाच्या
सारवण्याने भारतुय स्त्रियांची जीवनसत्व B12
ची आवश्यकता पूर्ण होते.हातावाटे व पायावाटे
B12 शरीरात जाते
४: रोग प्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात आहे
५: सायने ता.मालेगाव,जि. नाशिक येथील
श्री जितेंद्र कुटुमुटिया यांनी गायीच्या १grm
शेणात ३३कोटी जिवाणू आहेत असे अभ्यासले
आहे,त्यामुळे गायीत ३३ कोटी देव आहेत ही
संकल्पना दृढ झाली असावी.३३कोटी मधे
कोटी ही संख्या नसून कोटी म्हणजे प्रकार 
आसेही ते म्हणतात,म्हणजे ३३प्रकारचे जीवाणू
गायीच्या शेणात असतात असे म्हणता येईल.


श्री पळेकर सरांच्या मार्गदर्शनानुसार जीवामृतची
फवारणी पुढील प्रमाणे करावी:

१: १०लि पाणी+२००mlजीवामृत(गाळून घ्यावे)
     नंतर २१ दिवसांनी 
२: १० लि पाणी +५००ml जीवामृत
      पुन्हा २१दिवसांनी 
३: १० लि पाणी+७५०ml जीवामृत
४: १० लि पाणी +२००आंबट ताक
     पुन्हा २१ दिवसांनी 
५: १० लि पाणी + १ लि जीवामृत
     अशा प्रकारे ५ फवारण्या कराव्यात


Article By
Suchitra Diwan